वृक्षारोपण

वृक्षारोपन 


           जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिस्सी येथे कृषी दिनानिमित्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपन करण्यात आले.  तत्पूर्वी गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली होती, त्यात शाळेतील सर्व विद्यार्थयांनी सहभाग नोंदविला.  महाराष्ट्र शासनाच्या  दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट समोर ठेवून आखण्यात आलेल्या या उपक्रमात शिक्षक-विद्यार्थ्यांसोबत गावातील प्रतिष्टीत लोकांनीही यात सह्भाग नोंदविला. 
         शाळेच्या परिसरात मोठी झाडे असून काही ठिकाणी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी नवीन रोपांची लागवड करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोगल दिलीप महादेवराव यांनी वृक्षाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे संचालन श्री. हारकळ आत्माराम पिराजी यांनी केले. श्री. कुलकर्णी रुपेश यांनी स्वतःच्या टँबलेट वर चित्रफितीसह पर्यावरणाचा होणार नाश आणि त्याचे दुष्परिमाण हे स्पष्ट करून दिले. श्री. कटारे कृष्णा कैलासराव यांची परिसरातील विविध घटक कसे एकमेकांवर अवलंबून असतात याचा उलगडा केला. श्री. कलकोटे नागनाथ रामभाऊ यांनी गाण्यातून झाडांविषयीचे महत्त्व सांगितले. श्री. कांबळे बापूराव वामनराव यांनींहि आपले मोलाचे मार्गदर्शन केले तर श्री. गावित शमुवेल कांतीलाल यांनी जंगलातील विविध झाडे आणि त्यांचे उपयोग सांगतिले. 
            शेवटी श्रीमती लोमटे वर्षा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे आभार मानले.







No comments:

Post a Comment